ब्रम्हपुरी:-
तालुक्यातील मुख्य महामार्गावर असलेल्या गांगलवाडी येथील तलावात इसमाने उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक:-५/४/२०२४ ला अंदाजे सकाळी ५ ते ६ वाजताच्या दरम्यान घडली.
पुरुषोत्तम सूर्यवंशी वय वर्ष ५५ गांगलवाडी येथील रहिवाशी आहे.
सविस्तर वृत्तांत असे आहे की, मृतक पुरूषोत्तम चा केस कर्तनालयाचा व्यवसाय होता. सकाळी दररोज ८ ते ९ वाजता केस कर्तनालयाचे दुकान सुरू करायला जायचा माञ आज सकाळी ५ ते ६ वाजता घरून केस कर्तनालय दुकानाकडे गेला आणि केस कर्तनालय दुकानाचे शटर थोडे उघडून सायकलने तलावाकडे गेला.सायकल आणि चप्पल तलावाजवळ ठेवून तलावात उडी घेतली. ही माहिती कुटुंबीयांना माहिती होताच घटनेची माहिती पोलिस विभागाला देण्यात आली. एका पाणबुड्याच्या साह्याने तलावातील पाण्यात पुरुषोत्तम चा शोध घेतला असता दूपारी १ वाजताच्या दरम्यान पुरुषोत्तमचा शोध लागला.तलावातील पाण्याच्या बाहेर पुरुषोत्तमचा मृतदेह बाहेर काढून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालय ब्रम्हपुरी येथेनेण्यात आले. मृतक पुरुषोत्तम च्या पच्छात्य पत्नी, मुले सुन नातवंडं असा आप्त परीवार आहे.
घटनेचा पुढील तपास संबधित पोलिस विभाग करीत आहेत.
(प्रशांत गेडाम) सिंदेवाही प्रतिनिधि
सिंदेवाही -सिंदेवाही शहरालगत ठकाबाई तलाव जवळ कच्चेपार रोड मार्गावर लाकड़ाने भरलेला ट्रेक्टर पलटी झाल्याने 1 जागिच ठार तर 3 गंभीर जख्मी झाल्याची घटना आज दि. 10/3/2024 रोज रविवार ला दुपारी 12-30 वाजता दरम्यान घडली आहे.
सविस्तर वृत असे की आज दि. 10।3।2024 रोज रविवार ला दुपारचा सुमारास कच्चेपार सिंदेवाही रोडवर लाकुड़ घेऊन येणाऱ्या ट्रेक्टर चे समोर चे दोन्ही चाक अचानक फुटल्याने चालकाचे ट्रेक्टर वाहना वरुन नियंत्रण सुटले व ट्रेक्टर एका झाडाला जाऊन धडकले ही धडक ईतकी जोरदार होती कि, भीषण अपघात घडला
यात उमेश अशोक आदे वय 32 राहणार महात्मा फुले चौक सिंदेवाही हा जागिच ठार झाला असुन गंभीर जखमी मध्ये ट्रेक्टर चालक मुन्ना देवराव गावतुरे हमाल अनिल सदाशिव मोहुर्ले व सुखदेव विट्ठल गावतुरे हे सर्व राहणार सिंदेवाही हे तिघेही गंभीर जख्मी झाले याची माहिती पुलिस स्टेशन सिंदेवाही ला मिळताच तात्काळ पोलीस ठाणेदार चव्हाण आपल्या पथकासह घटना स्थळी जाऊन ट्रेक्टर अपघातल्या ट्रेक्टर मध्ये फसलेल्या जेसीबी च्या सहाय्याने मृतक व जख्मीना बाहेर काढले. व लगेच एम्बुलेंस चा सहाय्याने शहरातील ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे दाखल केले. सदर घठणेचा पुढील तपास पोलिस ठाणेदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.